पुणे : आयटीसी लिमिटेड कंपनी आणि सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने 'आयटीसी सुनहरा कल' उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ५० दिव्यांग (विशेष सक्षम ) व्यक्तींना उद्योजकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेतून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम विजय माला विद्या मंदीर इंग्लिश स्कूल, शिरुर मध्ये पार पडला.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय माला विद्या मंदीर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या मारीया साठे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पालमवार, जनरल मॅनेजर ICML फुड फॅक्टरी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून ITC कंपनीचे मुनेश सक्सेना सिनियर प्रोग्राम मॅनेजर ITC व सायली कदम सिनियर प्रोग्राम ऑफिसर ITC हे उपस्थित होते. डॉ. मनोज कुलकर्णी, प्रकल्प समन्वयक व वैभव निमगिरे प्रकल्प व्यवस्थापक हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव निमगिरे यांनी ITC व सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्क मार्फत राबविण्यात आलेल्या वरील प्रशिक्षणाची थोडक्यात माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्या मारीया साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वतःवर, तुमच्या क्षमतेवर आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा असे सांगितले आणि या उपक्रमात आपल्या संस्थेला सहभागी होता आले या बद्दल आनंद व्यक्त केला.

जनरल मॅनेजर ICML फुड फॅक्टरी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सचिन पालमवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषणात आजच्या डिजिटल युगात फक्त हे प्रशिक्षण घेऊन न थांबता आपण पुढील नव नवे तंत्रज्ञान अवगत करावे असा मोलाचा सल्ला दिला

हा संपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, तसेच सोनाली भट्टाचारजी, प्रकल्प संचालिका, सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे व ITC कंपनीचे मुनेश सक्सेना, सायली कदम, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना मळगंगा इन्फोटेक च्या संचालिका शुभांगी लंके व महेश लंके यांचे सहकार्य लाभले.

'डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर' या अभ्यासक्रमाचे हे प्रशिक्षण तीन महिन्यांचे असून पात्रताधारक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे निःशुल्क आहे. यामध्ये तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच उद्योजकता विकास आणि रोजगारक्षम होण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना देण्यात आले. आयटीसी कंपनी यापुढेही दिव्यांगांसाठी असे उपक्रम राबवीत राहणार असल्याची माहिती सचिन पालमवार यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज कुलकर्णी यांनी केले. तर आभार सायली कदम यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने