सुमीत एसएसजी बीव्हीजी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत १० वर्षांचा कन्सेशन करार
पुणे : सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत 10 वर्षांचा कन्सेशन करार केला असून, भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असून, एकूण अंदाजे INR 1,600 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) 108 अॅम्बुलन्स प्रोग्रॅम संपूर्ण राज्यभर अंमलात आणणे हा आहे. या करारांतर्गत, भागीदार संस्था 1,756 अत्याधुनिक अॅम्बुलन्सेस तैनात करणार असून, त्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील, जे आपत्कालीन प्रसंगी अत्यावश्यक "गोल्डन अवर"मध्ये रुग्णांना तातडीची काळजी प्रदान करतील. नवीन MEMS 108 प्रकल्पाचा प्रारंभ महाराष्ट्रभर पाच टप्प्यांत होणार असून, त्याची अंमलबजावणी नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल.
नवीन अत्याधुनिक अॅम्बुलन्सेसमध्ये मोबाइल डेटा टर्मिनल्स (MDT), टॅबलेट पीसीस, RFID, GPS, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, CCTV आणि TRIAGE सीस्टिम्ससारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानांची यंत्रणा बसविली जाईल. या वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM), कॉम्प्युटर-एडेड डिस्पॅच (CAD), वाहन ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन (VTMS) व रुग्ण आगमन सूचना या अंतर्निहित सीस्टिम्सही समाविष्ट असतील.
या ताफ्यामध्ये अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS) अॅम्बुलन्सेस, बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) अॅम्बुलन्सेस, निओनॅटल केअर युनिट्स, फर्स्ट रेस्पॉन्डर बाइक्स, तसेच सी आणि रिव्हर बोट अॅम्बुलन्सेस समाविष्ट असतील. दीर्घकालीन दृष्टिकोनातून, MEMS 108 प्रोग्रॅमचा उद्देश मेडिकल अॅप्लिकेशन ड्रोन आणि हेलिकॉप्टर-आधारित आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचा आहे.
हा उपक्रम भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रासाठी एक नवीन मानक स्थापित करेल. हा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कार्यक्षमतेसह उच्च-गुणवत्तेच्या सेवा पुरविण्यासाठी एक दीर्घकालिक व टिकाऊ मॉडेल निर्माण करेल, तसेच भविष्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी एक आदर्श उभा करेल.
टिप्पणी पोस्ट करा