‘द कल्याणी स्कूल’चा सीबीएसई परीक्षेत डंका – दहावी व बारावी दोन्ही वर्गांत १००% निकाल!
पुणे – पुण्यातील नामवंत द कल्याणी स्कूलने यंदाच्या सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांत १०० टक्के निकालाची घवघवीत कामगिरी करत आपल्या दर्जेदार शिक्षणपद्धतीची पुन्हा एकदा उजळणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या आणि अभिनव शिक्षणपद्धती राबविणाऱ्या या शाळेच्या वाटचालीतील हे एक अत्यंत उल्लेखनीय पर्व ठरले आहे.
बारावीतील यशस्वी कामगिरी
या वर्षीच्या बारावीच्या परीक्षेला एकूण ११७ विद्यार्थ्यांनी बसून यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यातील ४५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. शाळेने पारंपरिक शाखा रचना मागे टाकून नव्या शैक्षणिक धोरणांनुसार इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे निकाल शाखानिहाय विभागले गेले नाहीत.
टॉपर्स (बारावी):
मुग्धा फाटक – ९७.४%
वाई. श्री लक्ष्मी मानसा – ९७.२%
अनिश गंगावरम – ९६.६%
दहावीतील अभूतपूर्व यश
दहावीच्या परीक्षेत एकूण ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.
टॉपर्स (दहावी):
अर्णव पक्कला – १००%
सिया पियुष धगर – ९९.४%
श्रेया कुडनूर – ९९%
ईशा जैन – ९३%
(ईशा जैन हिला दृष्टीदोष असूनही तिच्या प्रेरणादायी यशाला समाजभरातून दाद मिळत आहे.)
मुख्याध्यापिका व संचालिकांची प्रतिक्रिया
या यशाबाबत मुख्याध्यापिका मिसेस निर्मल वड्डन म्हणाल्या,
“निकाल ही केवळ विद्यार्थ्यांची मेहनत नव्हे, तर आमच्या शिक्षकांच्या सातत्यपूर्ण समर्पणभावाची आणि शिक्षणातील उत्कटतेची फलश्रुती आहे. आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिज्ञासा आणि मूल्यनिष्ठतेची पेरणी करण्यास सतत प्रयत्नशील असतो.”
शाळेच्या संचालिका मिस दीक्षा कल्याणी यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत म्हटले,
“अशा प्रकारची सातत्याने मिळणारी शैक्षणिक गुणवत्ता आमच्या शाळेच्या ‘करुणेने प्रेरित महत्त्वाकांक्षा’ या तत्त्वज्ञानाला बळकटी देते.”
द कल्याणी स्कूलने पुन्हा एकदा दाखवून दिलं की आधुनिक, मूल्याधारित आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षण पद्धतीच विद्यार्थ्यांच्या यशाचा खरा पाया ठरतो.
टिप्पणी पोस्ट करा