ब्रेन अ‍ॅन्युरिझमचे घातक परिणाम

पुणे : ब्रेन अ‍ॅन्युरिझम ही मेंदूशी संबंधित गंभीर वैद्यकीय अवस्था असून, यामध्ये मेंदूतील रक्तवाहिनी फुगते. ही फुगलेली रक्तवाहिनी फुटल्यास मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो, जो जीवघेणा ठरू शकतो. जहाँगीर हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. आनंद अलूरकर म्हणाले, “मेंदूतील अ‍ॅन्युरिझम म्हणजे रक्तवाहिनीत होणारा फुगवटा, जो फुटल्यास रक्तस्त्राव होतो आणि त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तातडीने उपचार आवश्यक आहेत.”

डॉ. अलूरकर म्हणाले, काहींना जन्मतः रक्तवाहिन्यांची भिंत कमकुवत असते. उच्च रक्तदाब, धूम्रपान, वाढते वय आणि अपघात यामुळेही अ‍ॅन्युरिझम होऊ शकतो. फुटल्याशिवाय बहुतेक वेळा लक्षणे दिसत नाहीत. फुटल्यानंतर अचानक तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलटी, दृष्टिदोष, शुद्ध हरपणे आणि फिट्स होतात.

वेळीच निदान व प्रगत उपचारांनी अ‍ॅन्युरिझम नियंत्रित करता येतो. सीटी स्कॅनद्वारे रक्तस्त्राव ओळखता येतो. एमआर व सीटी अँजिओग्राफी निदानासाठी उपयुक्त असतात, मात्र डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी सर्वोत्तम पद्धत आहे. जहाँगीर हॉस्पिटलमध्ये मायक्रोकॅथेटरद्वारे प्लॅटिनम कॉइल टाकून अ‍ॅन्युरिझम सील केले जाते. गरजेनुसार बॅलून किंवा स्टेंटही वापरला जातो.

“आमच्याकडे दोन प्रगत कॅथ लॅब्स आणि २४ तास तैनात न्युरोव्हॅस्क्युलर पथक आहे. येथे एव्हीएम एम्बोलायझेशन, कॅरोटिड व इंट्राक्रॅनियल स्टेंटिंग, स्ट्रोकसाठी मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी आणि सबड्युरल हेमॅटोमासाठी एमएमए एम्बोलायझेशनसारखे उपचार होतात,” असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने