पुणे : द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय),पश्चिम विभाग तर्फे मोशी मधील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे 9 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान वाहन उद्योगासाठी नेक्सजेन मोबिलिटी शो 2025 या प्रदर्शन व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे या एक्स्पोचे तिसरे वर्ष आहे.
सीआयआय पश्चिम विभागाच्या फ्युचर मोबिलिटी टास्क फोर्सचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि. चे उपाध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की, इनोव्हेट.इंटिग्रेट.इम्पॅक्ट : द फ्युचर ऑफ मोबिलिटी या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम वाहन उद्योगातील संपूर्ण मूल्यसाखळीला एकत्रित आणेल. यामध्ये व्यावसायिक वाहने,प्रवासी वाहने,धोरण आणि नियामक मार्गदर्शक तत्वे, ईव्ही व्यवसाय परिसंस्था विकास, शाश्वत चार्जिंग पायाभूत सुविधा, बॅटरी तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह आफ्टर मार्केट, ऑटोमोटिव्ह मटेरियल्स, ऑटोमोटिव्ह लॉजिस्टिक्स, ईव्ही उत्पादन अभिनवता व गुंतवणूक, रॅपिड मेट्रो,हाय स्पीड ट्रेन्स,शहरी हवाई गतीशीलता आणि पायाभूत सुविधा विकास यासारख्या विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील.

टिप्पणी पोस्ट करा