जगातील पहिलाच एक टन क्षमतेचा मिनी ट्रक


पुणे : इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ऑयलर मोटर्स’ने पुण्यात ‘ऑयलर टर्बो ईव्ही १०००’ हा एक टनी क्षमतेचा फोर व्हील ईसीव्ही सादर केला. शहरातील वाढत्या वाहतुकीमध्ये अवजड माल वाहून नेणे आणि दैनंदिन खर्चांत बचत करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी या ट्रकची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रकची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होते. ‘टर्बो ईव्ही १०००’ हे जगातील सर्वांत परवडणारे एक टनी वाहन असून, डिझेलवरील अन्य वाहनांच्या तुलनेत वार्षिक १.१५ लाखांची बचत करण्यास मदत करते. त्यामुळेच ते पुण्यातील व्यावसायिक ग्राहकांसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

इंधनाची वाढती किंमत, पर्यावरणाविषयी वाढती जागरूकता आणि राज्य सरकारच्या प्रगत ‘ईव्ही’ धोरणामुळे पुण्याचा व्यावसायिक मोबिलिटी बाजार इलेक्ट्रिक वाहनांकडे झुकत आहे. शहरातील लॉजिस्टिक्स इकोसिस्टीममध्ये पेलोड, कामगिरी आणि नफ्याचे वाढते महत्त्व आहे. ‘टर्बो ईव्ही १०००’ हा व्यावसायिक कामांसाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त असून, त्याची शक्तिशाली कामगिरी, विस्तृत रेंज, आणि वापरण्याचा कमी खर्च आदी कारणांमुळे हे वाहन ऑपरेटर आणि चालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

१४० ते १७० किलोमीटरची रेंज, १४० एनएमचा टॉर्क, २३० मिमीचा डिस्क ब्रेक, आर १३ व्हील प्लॅटफॉर्मसह उपलब्ध होणारे हे एक टन विभागातील पहिले इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन ठरले आहे. त्यामुळे चालक शहरातील कठीण रस्त्यांवर वेग आणि पेलोडमध्ये कोणतीही तडजोड न करता आत्मविश्वासाने वाहन चालवू शकतात. ‘टर्बो ईव्ही १०००’मध्ये ‘सीसीएस २’ फास्ट-चार्जिंग क्षमता असून, त्यामुळे ते सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर केवळ १५ मिनिटे चार्ज केल्यास ५० किलोमीटरचा पल्ला गाठू शकते. या ट्रकमध्ये २.५ मिमी लॅडर फ्रेम, ‘आयपी ६७’ प्रमाणित बॅटरी, आणि लेसर-वेल्डेड बॅटरी मॉड्युल्स टिकाऊपणा आणि विश्वसनीयता निश्चित करताात. त्यामुळे चालक जास्त फेऱ्या पूर्ण करू शकतात.

‘पुणे जलदगतीने लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होत असून, येथील ऑपरेटर पेलोड, खर्च कार्यक्षमतेवर आणि विश्वसनीयतेवर लक्ष केंद्रित करतात. टर्बो ईव्ही १००० हा ट्रक डिझेलसारखी ताकद आणि कामगिरीच्या जोरावर इंधनखर्चात मोठी बचत करतो. त्यातच वार्षिक १.१५ लाख रुपयांपर्यंत बचत, वेगवान चार्जिंग, आणि सर्वोत्तम रेंजसह चालक आणि व्यवसायांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज झाला आहे,’ अशी माहिती ‘ऑयलर मोटर्स’चे संस्थापक आणि सीईओ सौरवकुमार यांनी दिली.

‘टर्बो ईव्ही १०००’ हे ‘ऑयलर मोटर्स’चे तिसरे उत्पादन असून, ते तीन व्हेरियंट्समध्ये (सिटी, फास्ट चार्ज आणि मॅक्स) उपलब्ध आहे. या तिन्ही व्हेरियंटसच्या किमती अनुक्रमे ५,९९,९९९ रुपये (सिटी) ८,१९,९९९ रुपये (फास्ट चार्ज) आणि ७,१९,९९९ रुपये (मॅक्स) आहेत. ही तिन्ही उत्पादने दरमहा १०,००० रुपयांच्या सुलभ ‘ईएमआय’सह ४९,९९९ रुपयांच्या डाउनपेमेंटवर उपलब्ध आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने