सोलापूर व मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कुटुंबांना मदतीची गरज आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट, धनकवडी पुणे तर्फे श्री शंकरबाबा भक्तांच्या वतीने अतीवृष्टी मुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदती साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १० लाख रूपयांची मदत जमा करण्यात आली.

ॲाक्टोबर महिन्यात श्री सद्गुरू शंकर महाराज प्रकटदिन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या खर्चात कपात करून सदरची रक्कम आपदग्रस्तांना देण्याचा निर्णय समाधी ट्रस्टने घेतल्याची माहिती विश्वस्त श्री सुरेंद्र वाईकर यांनी दिली.

याप्रसंगी विश्वस्त श्री सुरेंद्र वाईकर, श्री प्रताप भोसले व मा. मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते.

विश्वस्त मंडळ
डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री सतीश कोकाटे (सचिव), श्री सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. मिहीर कुलकर्णी, श्री राजाभाऊ सुर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने