एमआयटी-एडीटी विद्यापीठात वर्ल्ड पीस डोम येथे रंगली भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान स्पर्धा
पुणे : रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि STEM शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रगण्य उपक्रम असलेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ ला पुण्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या वर्ल्ड पीस डोम येथे झालेल्या उद्घाटन समारंभात देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभरातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५०० हून अधिक रोबोट्सच्या सहभागाने ही स्पर्धा यंदा ऐतिहासिक ठरली आहे. शासकीय शाळा, खाजगी संस्था तसेच वंचित समाजघटकातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीच्या स्पर्धेत ग्रामीण आणि आदिवासी भागातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याने STEM आणि रोबोटिक्स शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक व्यासपीठ मिळाले आहे. कार्यक्रमात रोबोटेक्स इंडिया २०२४ चा प्रवास दर्शवणारा विशेष व्हिडिओ सादर करण्यात आला. शेवटी डॉ. शांतिपाल ओहोल यांनी आभार प्रदर्शन करून औपचारिक उद्घोषणा केली आणि
टिप्पणी पोस्ट करा