पुणे : आपणच रंगवूया आपला बाप्पा, आपल्या मुलांसंगे ..ह्या कल्पनेवर आधारीत डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेने, तेजोमय कला मंदिरचे आनंद भांबुर्डेकर, प्रेरणा कुलकर्णी, सोनाली नेने यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक खास कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेचा उद्देश डिजिटल मिडिया पासून लांब राहून पालक आणि मुलांनी एकत्र वेळ घालवावा असा होता.
या कार्यशाळेत पेणहून आणलेल्या शाडूच्या गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी रंगविल्या. मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला रंगवताना पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर उमटलेला आनंद अवर्णनीय होता.ही प्रेरणादायी कार्यशाळा शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून साकारली गेली. शंभरहून अधिक सहभागी झालेल्या मुलांना स्वतः रंगवलेला बाप्पा घरी घेऊन जाण्याचा हा अनुभव अविस्मरणीय ठरला.पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी अभिजीत शिराळकर यांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा