· गॅलेक्सी ए१७ ५जी मध्ये चाहत्यांची आवडती एआय वैशिष्ट्ये - सर्कल टू सर्च आणि जेमिनी लाइव्ह आहे.
· भारतात विकसित करण्यात आलेले नवीन 'मेक फॉर इंडिया' वैशिष्ट्य ऑन-डिवाईस वॉईस मेल गॅलेक्सी ए१७ ५जी सह पदार्पण करत आहे.
गुरूग्राम, भारत - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सर्वात किफायतशीर गॅलेक्सी ए सिरीज एआय स्मार्टफोन 'गॅलेक्सी ए१७ ५जी'च्या लाँचची घोषणा केली. ७.५ मिमी जाडी असलेला गॅलेक्सी ए१७ ५जी त्याच्या श्रेणीमधील सर्वात सडपातळ स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचे वजन फक्त १९२ ग्रॅम आहे, ज्यामुळे हातामध्ये सहजपणे मावतो आणि वापरता येतो. सॅमसंगचा भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन व या नवीन स्मार्टफोनचा पूर्वाधिकारी गॅलेक्सी ए१६ ५जी ला मिळालेल्या भव्य यशानंतर गॅलेक्सी ए१७ ५जी लाँच करण्यात आला आहे.
गॅलेक्सी ए१७ ५जी भारतातील अधिकाधिक ग्राहकांना प्रमुख नाविन्यतांचा अनुभव देण्याचा गॅलेक्सी ए सिरीजचा वारसा पुढे घेऊन जातो. गॅलेक्सी ए१७ ५जी सह ग्राहकांना स्टायलिश व स्लीक डिझाइन, विश्वसनीय कार्यक्षमता व स्मार्ट एआय वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन किफायतशीर दरामध्ये मिळतो. गॅलेक्सी ए१७ ५जी मध्ये श्रेणीमधील सर्वोत्तम एआय वैशिष्ट्ये, डिस्प्ले, कॅमेरा, सुरक्षा वैशिष्ट्ये, कॉलिंग अनुभव व ओएस अपग्रेड्स आहेत, ज्यामुळे हा सणासुदीच्या काळासाठी सॅमसंगचा सर्वोत्तम स्मार्टफोन आहे.
''गॅलेक्सी ए सिरीज किफायतशीर दरामध्ये प्रमुख नाविन्यता अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या वारसामुळे आमची सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सिरीज आहे. गॅलेक्सी ए१७ ५जी आमचा सर्वात किफायतशीर गॅलेक्सी ए सिरीज एआय स्मार्टफोन आहे आणि सर्कल टू सर्च व जेमिनी लाइव्ह अशा चाहत्यांच्या आवडत्या एआय वैशिष्ट्यांसह येतो. या स्मार्टफोनमध्ये कॉलिंग अनुभव अधिक उत्साहित करण्यासाठी भारतीय अभियत्यांनी विकसित केलेले नवीन 'मेक फॉर इंडिया' वैशिष्ट्य ऑन-डिवाईस वॉईस मेल आहे. गॅलेक्सी ए१७ ५जी सणासुदीच्या काळासाठी आमची प्रमुख ऑफरिंग आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, या नवीन स्मार्टफोनला मिळणारे यश आम्हाला या वर्षाच्या अखेरपर्यंत १०० दशलक्ष आनंदी गॅलेक्सी ए सिरीज ग्राहक सुनिश्चित करण्यास मदत करेल,'' असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे संचालक अक्षय राव म्हणाले.
सर्वांसाठी एआय
गॅलेक्सी ए१७ ५जी सर्कल टू सर्च विथ गुगलसह येतो, ज्यामुळे गॅलेक्सी इकोसिस्टममधील अधिकाधिक डिवाईसेसमध्ये मोबाइल एआय अधिक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. सॅमसंग-गुगल यांच्यामधील सहयोगावर आधारित डिझाइन करण्यात आलेले सर्कल टू सर्च गॅलेक्सी वापरकर्त्यांना फोटो, टेक्स्ट्स व संगीतासंदर्भात विनासायास सर्च अनुभव देते. तसेच, हा स्मार्टफोन जेमिनी लाइव्हसह नवीन एआय अनुभव देखील देईल, ज्यामुळे गॅलेक्सी वापरकर्त्यांना एआयसोबत रिअल-टाइम व्हिज्युअल संवाद करता येतील. एआय-समर्थित सहाय्यतेच्या माध्यमातून गॅलेक्सी ए१७ ५जी वापरकर्ते अधिक सहजपणे परस्परसंवाद करू शकतात, ज्यामुळे दैनंदिन टास्क्स अधिक सोपे होतील. गॅलेक्सी ए१७ ५जी ऑन-डिवाईस वॉईस मेल वैशिष्ट्य असलेला पहिला गॅलेक्सी स्मार्टफोन देखील आहे, जेथे इन्कमिंग कॉल उचलला नाही तर आपोआप संदेश पाठवला जातो.
ऑसम नो शेक कॅमेरा आणि सुपर एएमओएलईडी डिस्प्ले
वैविध्यपूर्ण ट्रिपल-लेन्स कॅमेरा सिस्टम असलेल्या गॅलेक्सी ए१७ ५जी मध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (ओआयएस) आहे, जो नो-शेक कॅम म्हणून लोकप्रिय आहे. हे तंत्रज्ञान आव्हानात्मक स्थितींमध्ये देखील ब्लर-मुक्त व्हिडिओ व फोटो कॅप्चर करण्यास मदत करते. या कॅमेऱ्याला पूरक ५ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स व मॅक्रो लेन्स आहे, ज्यामुळे विस्तृत दृश्यांपासून जवळचे फोटो सुस्पष्टपणे कॅप्चर करता येतात. गॅलेक्सी ए१७ ५जी मध्ये श्रेणीमधील अग्रणी ६.७ इंच फुल एचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आहे, ज्यामुळे प्रखर प्रकाशात देखील सुस्पष्ट व आकर्षक डिस्प्ले क्वॉलिटीची खात्री मिळते.
दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणासाठी डिझाइन करण्यात आला आहे - आतून व बाहेरून सुरक्षित
गॅलेक्सी ए१७ ५जी मध्ये टिकाऊपणा प्रमाणित म्हणून येतो. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग® गोरिला® ग्लास व्हिक्टस® (पुढील बाजूस) आहे, तसेच धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी५४ रेटिंग कायम ठेवण्यात आले आहे. गॅलेक्सी ए१७ ५जी श्रेणीमधील अँड्रॉइड अपडेअ्सचे सर्वोत्तम ६ जनरेशन्स आणि ६ वर्ष सिक्युरिटी अपडेट्स देतो, ज्यामुळे भविष्यासाठी सुसज्ज अनुभवाची खात्री मिळते. गॅलेक्सी ए१७ ५जी वन यूआय ७ आऊट ऑफ द बॉक्ससह येतो.
उत्तम कार्यक्षमता
५ एनएम एक्झिनॉस १३३० प्रोसेसरची शक्ती असलेला गॅलेक्सी ए१७ ५जी गतीशील व ऊर्जा कार्यक्षम स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी दीर्घकाळपर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व मनोरंजनाचा आनंद मिळण्याची खात्री देते. गॅलेक्सी ए१७ ५जी वापरकर्त्यांना विनाव्यत्यय कनेक्टेड राहण्याची, मनोरंजनाचा आनंद घेण्याची आणि उत्पादनक्षम राहण्याची सुविधा देतो. या डिवाईसला २५ वॅट फास्ट चार्जिंगचे पाठबळ आहे, ज्यामुळे डिवाईस कमी वेळेत लवकर चार्ज होतो.
टिप्पणी पोस्ट करा