डी. ई. एस प्रायमरी शाळेत 300 विद्यार्थीनींनी सादर केले पारंपरिक खेळ

पुणे : धकाधकीच्या जीवनात पारंपारिक खेळ कोणी खेळताना दिसत नाही, खरंतर या खेळांचं खूप महत्त्व आहे. जातं असेल, फुगडी असेल, पिंगा असेल, काळाच्या ओघात हे खेळ विसरून न जाता, काळ सुसंगत हे खेळ आहेत. आणि ते खेळले गेले पाहिजेत हाच संदेश देत, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण डी. ई. एस प्रायमरी स्कुलच्या 300 हून विदयार्थीनीनी नागपंचमी दिवशी केले.



झिम्मा खिस बाई खिस, गाठोडी, पिंगा, सुपारी, खिस बाई खिस, नाच ग घुमा... असं म्हणत इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विदयार्थीनींनी 22 हून अधिक पारंपरिक खेळ सादर केले. विद्यार्थिनीनी जुन्या नव्या खेळांचा मेळ घालून नागपंचमी साजरी केली. सुरुवातीला नाग पूजन करण्यात आले. त्यानंतर झिम्मा, फुगडी ने पारंपारिक खेळाला सुरुवात झाली. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणाऱ्या हे खेळ किती महत्त्वाचे आहेत हे अनोख्या कार्यक्रमातून पटवून देण्यात आले. मुख्यध्यापिका अर्चना धनावडे, पर्यवेक्षिका ग्रेसी डिसुझा, अमित कुलकर्णी यांनी विदयार्थ्यांना नागपंचमीचे महत्व पटवून दिले. हे सर्व खेळ क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे यांनी विदयार्थिनींनी कडून बसवून घेतले.



राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शारीरिक शिक्षण हा विषय आणि इतर विषय म्हणजेच भाषा गणित विज्ञान परिसर अभ्यास यांची उत्तम रीतीने सांगड घालण्यात आली. क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे यांनी स्वतः या खेळांसाठी काही काव्यपंक्ती तयार केल्या तर कार्यक्रमाचे निवेदन योगिनी कानडे यांनी, संगीत शिक्षिका हर्षदा कारेकर यांनी गायन केले. हर्षदा कारेकर यानी सूत्रसंचालन केले. सायली मराठे यांनी नागपंचमी या दिवसाची माहिती सांगितली. एक तासाच्या कार्यक्रमात जिम्नॅस्टिक, योगा, कराटे या खेळांना महत्त्व आहेच पण मूळ पारंपारिक खेळातूनच हे खेळ आले. जुनं ते सोनं कसं,धकाधकीच्या जीवनात ते हरवू नयेत म्हणून हे खेळ सादर करत त्यांचा महत्व सांगण्यात आले.

तर दुपार विभागाने जलसंवर्धन व निसर्ग रक्षणाच्या संदेशाने नागपंचमी साजरी केली. या सणाच्या निमित्ताने पारंपरिक कथा व भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंगकोब्रा अर्थात नागराज सर्पाची क्रीडाशिक्षक श्रीकांत जोशी यांनी गोष्टीस्वरूपात प्रेझेंटेशन द्वारे माहीती दिली. मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी हिंदु संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे वैज्ञानिक महत्त्व सांगितले तर पर्यवेक्षक सिमरन गुजर यांनी जलप्रदूषण न करण्याचा संदेश दिला. वृक्ष व सर्प संवर्धनाच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. या प्रसंगी क्रीडाशिक्षकांनी सर्प व निसर्ग संवर्धनाचा संस्कार रुजवणारे सांघिक व वैयक्तिक खेळ घेतले.


सर्व वर्गशिक्षक, विषय शिक्षक व कर्मचारी यांचाही या कार्यक्रमात सहभाग  होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने