पुणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत पंढरीच्या वारीचा अनुभव विद्यार्थ्यांनी दिंडी काढून घेतला. विठ्ठल,रुक्मिणी सह ज्ञानदेव,तुकाराम नामदेव,मुक्ताई अशा विविध संतांच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वारीत सहभागी झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माजी प्रबंधक डॉ.सविता केळकर यांच्या स्वरचित 'पंढरीची वाट पाऊले चालती' या अभंगाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले.शाला समितीचे अध्यक्ष व प्रशालेचे सन्माननीय माजी विद्यार्थी डॉ.शरद अगरखेडकर, शालाप्रमुख अनिता भोसले,उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर व अंजली गोरे यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले व पालखी सोहळ्याला आरंभ झाला. 'अक्षरवारी' या सुलेखनाच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे.या प्रदर्शनात महाराष्ट्रातील २० सुलेखनकारांच्या ७०अक्षर कलाकृती सादर केल्या आहेत.
वारीतून पर्यावरणाचा संतुलन संदेश
पांडुरंगाच्या गजराने डी. ई.एस. प्रायमरीचे प्रांगण दुमदुमले औचित्य होते ते पंढरीच्या वारीचे.सर्व छोटे छोटे वारकरी सज्ज झाले होते आपल्या लाडक्या पंढरपूरच्या विठुरायाचे स्वागत करून एकादशी साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, पर्यवेक्षिका ग्रेसी डिसूजा यांना पारंपारिक पद्धतीने औक्षण करून या माऊलींना वृक्षारोपी भेट म्हणजेच तुळशी वृंदावन देऊन कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले.या कार्यक्रमात या दोन्ही माउलींनी पालखी पूजन करून विठुरायाचे नामस्मरण करून, विठुरायाचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. संगीत शिक्षिका हर्षदा कारेकर यांच्या सुमधुर भजन सादर केले.याप्रसंगी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. हरिपाठ सादर करून, हरिनामाचा गजर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी राहूरकर यांनी केले. यावेळी मनीषा डुकरे, अश्विनी भट, योगिनी कानडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे सायली मराठे, शितल बेलवटे या शिक्षकांनी रंगमंचा सजावटीची कामगिरी चोख बजावली. मुख्याध्यापिका अर्चना धनावडे व पर्यवेक्षिका ग्रेसी डिसुझा यांनी पर्यावरणाचा संतुलन राखत" नो प्लास्टिक"-- प्लास्टिक नको तर कागदी पिशवीचा अवलंब करा व पर्यावरणाचे संवर्धन करा असा संदेश दिला.
टिप्पणी पोस्ट करा