पुणे : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) आणि झेक रिपब्लिकमधील आर्चिप विद्यापीठात नुकताच एक सांमजस्य करार झाला.
त्यानुसार झेक रिपब्लिकमधील ‘नागरी नियोजन आणि रचना’ या विषयावर तिथे नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये बीएनसीएतील तीन प्राध्यापक तसेच पदवीपूर्व वर्गांमधील 33 विद्यार्थिनी सहभागी झाले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून हा सामंजस्य करार संपन्न झाला. डॉ.कश्यप म्हणाले , या करारानुसार दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील जॉईंट स्टूडिओ आणि संयुक्त संशोधनासाठी प्रत्यत्न करण्यात आले. तसेच दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांचेही आदान-प्रदान करण्यात आले. झेक रिपब्लिकच्या भेटीत बीएनसीएतील या प्रकल्पाच्या प्रमूख डॉ. श्रुती जोशी, तसेच प्रा. सुरभी गडकरी आणि प्रा. पूजा घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत आर्चिप विद्यापीठातील वास्तूरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) महाविद्यालयातील चार प्राध्यापक आणि पदव्युत्तर वर्षाच्या 12 विद्यार्थिनी सहभागी झाले.
डॉ. श्रुती जोशी म्हणाल्या , कार्यशाळेतून झेक रिपब्लिकमधील प्राग शहरातील उपनगर वेलेस्तावीन येथील मेट्रो स्टेशन परिसराचा अभ्यास करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा