‘टाटा पॉवर’ची ‘घरघर सोलर’ मोहीम पुण्यात सुरू
पुणे: ‘टाटा पॉवर’ची उपकंपनी असलेल्या व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील ‘टाटा पॉवर रिन्यूएबल्स’ने आज पुण्यात घरघर सोलर ही आपली महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली. या उपक्रमाचा उद्देश निवासी घरांवर सौरऊर्जा प्रणालींचा वापर वाढवणे हा असून, दर्जेदार, परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध सौरऊर्जा उपायांसह विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हा आहे.
‘घरघर सोलर’ मोहिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी विशेष योजना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सादर करण्यात आली आहे.नव्या योजनेत ग्राहकांना फक्त १९४७ रुपये भरून छतावरील सौर प्रणालीचे मालक होता येईल. ही रक्कम भारताच्या स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, जास्त रकमेच्या वीजबिलांपासून स्वातंत्र्य ही संकल्पना ती दर्शवते. या प्रणालीच्या किंमतीसाठी जवळपास १०० टक्के कर्जसुविधा उपलब्ध आहे. दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी २३६९ रुपयांपासून सुरू होणारे परवडणारे मासिक हप्ते, ६० महिन्यांपर्यंतचा सोयीस्कर कर्जकालावधी आणि जलद प्रक्रियेसाठी त्वरित डिजिटल कर्जमंजुरीची सुविधा अशी या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
अतिरिक्त लाभ म्हणून, ‘टाटा पॉवर सोलारूफ’च्या सर्व निवासी ग्राहकांना ‘टाटा एआयजी’ कंपनीकडून एक वर्षाची मोफत सौर विमा सुविधा देण्यात येत आहे.मोहिमेअंतर्गत छतावरील सौरऊर्जा स्थापनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांनी १८००२५७७७७७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा