पुणे : कात्रज, आंबेगाव येथील नवीन शोरूम गजबजलेल्या एनएच-४ मार्गावर पुण्याच्या ऑटोमोबाईल हबमध्ये मध्यवर्ती ठिकाणी वसलेली आहे. ६,५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या आधुनिक शोरूममध्ये एकावेळी ६ वाहने प्रदर्शित करता येतील. हे शोरूम ग्राहकांना सर्वसमावेशक अनुभव देण्यासाठी खास डिझाइन करण्यात आले असून, येथे ‘महिंद्रा’च्या सर्व प्रवासी वाहनांची (आयसीई व ईव्ही दोन्ही प्रकारची) संपूर्ण शृंखला उपलब्ध आहे.



आधुनिक रंगसंगती, नाट्यमय प्रकाश योजना, सुबोध तंत्रज्ञान आणि सहज संवाद यांच्या सहाय्याने या शोरूममधील प्रत्येक भाग प्रगत डिझाइन, बुद्धिमान नवोन्मेष आणि परिष्कृत सौंदर्याची अनुभूती देतो. ‘इन्ग्लो इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर’, जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह बौध्दिक प्रणाली (एमएआयए) आणि इतर ‘हीरो’ वैशिष्ट्ये या महिंद्राच्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा सखोल अनुभव ग्राहक येथे घेऊ शकतात.

या नव्या शोरूमच्या माध्यमातून ‘पीपीएस मोटर्स’ने भारतातील आपले व्यापक अस्तित्व आणखी बळकट केले आहे. सध्या हा समूह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये एकूण १३७ महिंद्रा टचपॉइंट्स चालवतो. फक्त आर्थिक वर्ष २०२५ मध्येच समूहाने ३७,०००हून अधिक ‘महिंद्रा’ची वाहने विकली असून, भारतातील ‘महिंद्रा’चा सर्वात मोठा विक्री आणि सेवा भागीदार म्हणून आपले स्थान त्याने पुन्हा अधोरेखित केले आहे.


पीपीएस मोटर्स – पुण्यातील व्यावसायिक महत्त्वाकांक्षा कात्रजमधील शोरूम हा ‘पीपीएस मोटर्स’चा पुण्यातील आठवा महिंद्रा टचपॉइंट आहे. यापूर्वी या कंपनीने पुण्यात ७ शोरूम्स आणि १ वर्कशॉप सुरू केलेले आहे. जुलै २०२४ मध्ये ‘पीपीएस’ने पुणे बाजारपेठेत प्रवेश केला. एका वर्षाच्या आत कंपनीने शहरात २,५०० हून अधिक ‘महिंद्रा’ची वाहने विकली. कंपनीच्या विस्ताराच्या आराखड्यानुसार, ती आणखी ३ शोरूम्स आणि २ वर्कशॉप्स सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुणे विभागात ‘महिंद्रा’चे एकूण १३ टचपॉइंट्स होतील. या विस्ताराच्या माध्यमातून पुण्यातील वार्षिक विक्रीचा आकडा ४,५०० ते ५,००० वाहनांपर्यंत वाढवण्याचा आणि त्यातून ८०० ते १,००० कोटी रुपयांपर्यंतचा महसूल मिळवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. 

 या उद्घाटनप्रसंगी ‘पीपीएस मोटर्स’चे व्यवस्थापकीय संचालक राजीव संघवी म्हणाले,“आमच्या १३७व्या महिंद्रा सुविधेचे उद्घाटन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘महिंद्रा’सोबतची आमच्या दीर्घकालीन भागीदारी यामुळे अधिक बळकट होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने