पुणे : केअर अँड रिसर्च सेंटरद्वारे पुण्यात कोरेगांव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे १२-१४ डिसेंबर दरम्यान ONCO 3Sixty २०२५ या तीन दिवसीय राष्ट्रीय ऑन्कोलॉजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तीन दिवसीय परिषदेत देशभरातील अग्रगण्य चिकित्सक, संशोधक व इनोव्हेटर्स एकत्र जमणार आहेत. उच्च स्तरीय संवाद, अर्थपूर्ण बातचित व अत्यंत आधुनिक ज्ञानाची देवाणघेवाण यांना चालना देण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये भारतातील कर्करोगाच्या देखभालीच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकेल, अशा चर्चा होईल.
ONCO 3Sixty २०२५ मध्ये २०२२ हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील, कर्करोगाच्या विविध अभ्यासशाखांमध्ये कार्यरत असलेल्या ऑन्कोलॉजिस्ट्सना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे व या परिषदेत रुग्णांच्या उदाहरणांवरील संवादात्मक चर्चा तसेच परखड वैज्ञानिक वादविवादांचा समावेश असणार आहे. 
कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर, चे सीनिअर ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील म्हणाले, “ONCO 3Sixty ने जागतिक स्तरावर लागणारे नवनवे शोध व भारतीय क्लिनिकल प्रॅक्टिस यांच्यातील एक सशक्त पूल म्हणून आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. अर्थपूर्ण संवाद, सहयोग व वैज्ञानिक दृढता यांमुळे देशभरातील रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळण्याच्या कामास गती मिळू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने