पुणे : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 'किसान' दि. १० ते १४ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या वर्षी प्रदर्शन ३० एकरावर विस्तारीत आहे. किसान प्रदर्शनाचे उदघाटन १० डिसेंबर ला सकाळी ९ वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
३० एकरावर पसरलेल्या किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती संयोजक निरंजन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रदर्शनाची पूर्वनोंदणी मोबाईलद्वारे करण्याची सोय आहे ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.
मातीमोल : मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम योजला आहे.
विविध उपक्रम
+ प्रदर्शन वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत
+ ६०० पेक्षा अधिक प्रदर्शक
+ भारतभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी व उद्योजक
+ ऑनलाईन पूर्वनोंदणीला प्रचंड प्रतिसाद
+ प्रदर्शक, त्यांची उत्पादने व सेवांची माहिती मोबाईल ॲपवर
मनाची मशागत : IPH च्या सहकार्याने शेतकऱ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती हा विशेष उपक्रम आहे. यात शेतकरी समुदायासमोरील ताणतणाव, भावनिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
मधमाशीशी मैत्री : ‘बसवंत हनीबी पार्क अँड ट्रेनिंग सेंटर’ यांच्या सहकार्याने परागीकरणाचे महत्व आणि आणि मधमाशांना अनुकूल अशा शेती पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते
किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहिती kisan.in या संकेतस्थळावर मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा