पुणे - डसॉल्ट सिस्टिम्स (Euronext Paris: FR0014003TT8, DSY.PA) यांनी आज आकृती इनोव्हेशन स्पर्धा २०२५ मधील विजेत्यांची घोषणा केली. ही आंतरराष्ट्रीय उत्पादन डिझाइन स्पर्धा असून, भारतातील तसेच इतर देशांतील अभियांत्रिकी, डिझाइन आणि तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत जागतिक पातळीवरील गंभीर समस्यांसाठी नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्याचे आव्हान या विद्यार्थ्यांनी पेलले. यंदा स्पर्धेच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला असून, ३६ नव्या देशांचा सहभाग या उपक्रमात जोडला गेला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटडचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप वीज यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  
आकृती इनोव्हेशन स्पर्धा २०२५ ही स्पर्धा चार टप्प्यांत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ५०४ महाविद्यालयांतील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थ्यी डसॉल्ट सिस्टिमच्या ३डी एक्सपिरियन्लच्या प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअली एकत्र आले होते. मानवी आरोग्य, शाश्वत शहरे, हरित ऊर्जा आणि शाश्वत गतिशीलता यांसारख्या क्षेत्रातील आवश्यक सकात्मक बदलांसाठी या सहभागी विद्यार्थ्यांनी टिकाऊ उपाय विकसित केले. सहभागी विद्यार्थ्यांना यात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. ३डी एक्सपिरियन्ससह स़ॉलिडवर्क्स, ३डीएक्सिट आणि ३डी एक्सपिरियन्स वर्क्स एप्लिकेशन्स तसेच डसॉल्ट सिस्टिम्सची अत्याधुनिक तंत्रज्ञान सिस्टीम्स हाताळता आली. स्पर्धेतील विजेत्या संघा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील इतर १२ संघांचे त्यांना आव्हान असेल. हॉस्टन येथे पार पडणा-या ३डी एक्सपिरियन्स वर्ल्ड या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याची घोषणा केली जाईल. 

आकृती २०२५ इंडिया जिओ फायनलचे विजेते:
कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची टीम सेंट्रॉइड
पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉल़ॉजीचा टीम इनोफोर्ज

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने