रंगावलीकार शारदा अवसरे आणि ३० कलाकारांचे सादरीकरण


पुणे : शंकर महाराजाना ओळखून नागाने पायाला मारलेली मिठी , तीन वाघिणींच्या मध्ये बाळ रूपात सापडलेले शंकर महाराज , खिरीत पडलेली चिमणी जिवंत केली , सरस्वतीच्या मुखातून ब्राह्मणांना वेद शिकवले …..अशा श्री शंकर महाराज यांच्या विविध कथांवर आधारित २० भक्तीकथा रांगोळ्यांच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांनी मिळाली.

श्री शंकर महाराज यांच्या कथांवर आधारित 'योगीराज ' या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रसिद्ध फलक रेखाटनकार , सुलेखनकार, रंगावलीकार, फोटोग्राफर आदरणीय श्री. अमित भोरखडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन, झाले. यावेळी श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट चे विश्वस्त सुरेंद्र वाईकर , प्रख्यात रंगावलीकार श्री अक्षय शहापूरकर सर , ज्येष्ठ रंगावलीकार श्री जगदीश चव्हाण सर , प्रदर्शनाच्या आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे उपस्थित होते.
प्रधानांना लंडन मध्ये असताना दिलेले दर्शन , श्री. दत्तगुरू , श्री. मछिंद्रनाथ आणि श्री. गोरक्षनाथांचे घडविलेले दर्शन , अहिंसा परमोधर्म चा दिलेले उपदेश, विठ्ठलाच्या रूपात शंकर महाराजांनी भक्ताला दिलेले दर्शन या रांगोळ्या कलाकारांनी अतिशय बारकाईने साकारल्या आहेत.

शारदा अवसरे म्हणाल्या, प्रदर्शनामध्ये एकूण २० रंगावलींचा समावेश आहे. श्री शंकर महाराज यांच्या कथांवर आधारित १६ , मूळ स्वरूपातील एक, श्री शंकरमहाराज मठ येतील एक, शंकर स्वरूपातील एक व अवतार स्वरुपातील एक भव्य रांगोळी ज्यात श्री स्वामी महाराज, श्री नृसिह सरस्वती महाराज, श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराज , श्री दत्तगुरू, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज, शिर्डी वाले साई बाबा व श्री शंकर महाराज यांचा समावेश असलेली अशी एकूण २० रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. सर्व रंगावली काढण्याकरिता एकूण ५० किलो रंगावली व रंगाचा वापर करण्यात आला आहे.

प्रदर्शनाकरिता श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे अक्षय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. दिनांक २४ ते २७ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत प्रदर्शन विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहनही शारदा अवसरे यांनी केले आहे.

फोटो ओळ - समर्थ सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या यांच्या विविध कथांवर आधारित 'योगीराज' या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. यावेळी रंगावली पाहताना पुणेकर.

अधिक माहितीसाठी : शारदा अवसरे (मो.८८८८८२०७१२)






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने