पुणे : श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे भवानी पेठ, नवी पेठ व मठामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये रुग्ण तपासणी व औषधांच्या वाटपासोबतच कास्यथाळी द्वारे पायांच्या मसाज करण्याच्या मशीनने वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून मसाज करण्यात आला. माऊली लेझर टेक यांनी नव्यानेच सदर मशीन डेव्हलप केले आहे. त्यांनी शिबिरांसाठी सात मशीन ट्रस्टला विनामोबदला उपलब्ध करून दिले.अंगदुखणे, सर्दी, खोकला तसेच सांधेदुखीसाठी पेन किलर मलम देण्यात आले. पावसामुळे त्वचा विकार होऊ नयेत म्हणून व झालेले त्वचा विकार लवकर बरे व्हावेत म्हणून अँटीसेप्टिक मलम देण्यात आला. सर्वांना व्हिटॅमिन बी-१२, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शिअम व आयर्न अशी पूरक औषध देऊन खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
ट्रस्टतर्फे दर आठवड्यात (मंगळवार) दांडेकर पूल मजूर अड्डा, (बुधवार) सुखसागर नगर मजूर अड्डा, (शुक्रवार) गोकुळ नगर मजुर अड्डा, (शनिवार) वारजे ब्रिज मजुर अड्डा अशा चार शिबिरांचे आयोजन करण्यात येते. के सी ठाकरे शाळा, भवानी पेठ एकूण रुग्णचिकित्सा २६५ धर्मवीर संभाजी शाळा, नवी पेठ एकूण रुग्ण चिकित्सा ३४७.
श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठ, धनकवडी एकूण रुग्ण चिकित्सा २७०. या शिबिरांसाठी पुणे मनपा ने मोफत औषध उपलब्ध करून दिली तसेच शिबिरात खालील डॉक्टर, कर्मचारी व सेवेकरी सहभागी झाले.डॉ निशिकांत जोशी, डॉ दिनेश बाऊस्कर, डॉ समीर जाधव, डॉ स्मिता जोशी, डॉ हर्षदा कुलकर्णी, डॉ विनय भोसले, डॉ रूपाली भोसले, डॉ आरती चौधरी, डॉ, आदिती कोंडे या डॉक्टरांनी रुग्ण तपासणीची जबाबदारी पार पाडली. सेवेकरी मधुरा बारटक्के, उज्वला बनकर, वासंती पवार, सुरेखा चौधरी, मालती रायकर, आकाश गुरव, मयुरेश लाड, निरव कुलकर्णी, सूर्यकांत जाधव, ओंकार पानसरे, अनिता भोसले, युवराज भोसले, ध्रुव कुलकर्णी, गिरीश कटारे यांनी डॉक्टरांना मदत केली. मठाचे कर्मचारी प्रवीण बाठे, प्रशांत हरगुडे, सिद्धू सुतार, प्रतीक ओझा, शिवाजी गजमल, सुभाष खैरमोडे, जयश्री माने, सुवर्णा जोशी यांनी डॉक्टर आणि वारकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली.
विश्वस्त मंडळ डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), सतीश कोकाटे (सचिव), श्री सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा