स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार 


पुणे दि.27(प्रतिनिधी )  : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल डेव्हलमेंट अँड टीव्हीईटी (तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण) या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन झाले.यावेळी अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार हे होते.  युनेस्को युनिवोकचे फेडरिक युब्लर, लडाख येथील एचआयएचे संस्थापक संचालक सोनम वांगचुक, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग व सिंबायोसिस स्किल्स अँड  प्रोफेशनल  युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार हे उपस्थित होते.

जागतिक शिक्षणाचे आदान प्रदान करणे, नाविण्यपूर्ण शिक्षणाची पद्धती व क्षमता निर्माण करण्यासाठी एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.


सोनम वांगचुक म्हणाले," शिक्षण क्षेत्रातील एआय व इंटरनेट गोष्टीने संपूर्ण जग बदलल आहेे. जुन्या काळात शिकण्याची पद्धत ही सर्वोत्तम असल्याने बुद्धीमत्तला अधिक जोर दयावा लागत असे. जीवनात प्रात्यक्षित शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण महत्वाचे आहे. हे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाते. 

डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले," युवकांच्या या देशात त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देऊन त्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे येथे युवकांना रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही तर रोजगार त्यांच्याकडे येईल. वर्तमानकाळात इंडस्ट्री आणि विद्यापीठामध्ये योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग केला पाहिजे. देश प्रगतीसाठी महिला सशक्तीकरण सर्वात महत्वाचे आहे.”

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या," गेल्या ५ वर्षात हजारो महिलांना भविष्यातील कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक काळात इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य कर्मचारी देण्यावर अधिक भर देऊन प्रशिक्षित करण्याचे कार्य केले जाते. राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्या दिशेने त्यांच्यासाठी हे विद्यापीठ कार्य करीत आहे.” 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने