सिंहगड रस्त्यावरील हिंगणे येथे व्हॅलेंटाईन डे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या तसेच हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकी चालकांचा सन्मान नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या वतीने करण्यात आला. या दुचाकी चालकांना गुलाब पुष्प आणि कॅडबरी देण्यात आली. हेल्मेट परिधान करणाऱ्या 50 हून अधिक वाहनचालकांचा सन्मान करण्यात आला . यावेळी नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्यासह महेश बाटले, ओंकार ताकतोडे, राजाभाऊ कदम ,सर्वज्ञ परदेशी, राहुल जोशी, संदीप गरई, सुजित गायकवाड, अनिल वाडकर उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने