सद्गुरू शंकरमहाराज समाधी मठात ५० वे मासिक रक्तदान शिबीर
पुणे, दि.3(प्रतिनिधी ) श्री. सद्गुरू शंकर महाराज मठात सुवर्णमहोत्सवी मासीक रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी आमदार ऊल्हास पवार, उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाला.
समाधी सोहळ्याच्या अमृत महोत्सवी वर्षा पासून दरमहीन्याच्या दुर्गाष्टमीस सातत्याने ५० महिने रक्तदान शिबीर आयोजीत करणारी शंकर महाराज समाधी ट्रस्ट ही एकमेव संस्था असून या पुर्वीच महाराष्ट्र शासनाने संस्थेस गौरव चिन्ह देऊन सन्मानीत केले आहे. तसेच ट्रस्ट तर्फे दररोज ५,००० विद्यार्थ्यांना मोफत खिचडी व ईतर पदार्थांचा वाटप होतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि धर्मवीर संभाजी मनपा शाळा नवी पेठ या तिन केंद्रांवर सदरचा मोफत भोजन प्रसाद वाटप होतो, अशी माहीती विश्वस्त सुरेंद्र वाईकर यांनी दिली.
उल्हास पवार म्हणाले आज मठ मंदिर या संस्थांनी आघ्यात्मित ऊपक्रमां बरोबरच सामाजीक ऊपक्रम राबवण्याची अत्यंत गरज आहे, ज्या योगे दिशाहीन तरूणांना योग्य मार्गांने जाऊन व्यसन मुक्तता झाली पाहीजे.
पुनीत बालन यांनी मठाच्या अन्नदान उपक्रमास पाहीजे ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
टिप्पणी पोस्ट करा