मोफत खिचडी-प्रसाद वाटप

 पुणे : भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी धुलीवंदनच्या दिवशी "रंगबरसे" हा रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो. यामध्ये अनाथ एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारे मुले, रस्त्यावर फुगे विकणारी मुले, डोंबाऱ्यांचा खेळ करणारी मुले, मतिमंद मुले, अंध आणि अपंग मुले, ऊस तोडणी कामगारांची मुले, देवदासी भगिनींची मुले एकत्र येऊन रंग खेळतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी व त्यांच्याबरोबर रंग खेळण्यासाठी सातत्याने गेली ३० बर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टच्या वतीने दरवर्षी मुलांसाठी खिचडी व शिरा देण्यात आला. सकाळी ८ ते १० पर्यंत साधारण १५०० मुलांना खिचडी, लोणचे व शिऱ्याचा नाष्टा देण्यात आला. 

यावेळी डॉ. श्री मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री सतीश कोकाटे (सचिव),  डॉ. पी. डी. पाटील,  सुरेंद्र वाईकर,  राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने